

Shimron Hetmyer 43 ball century in CPL
esakal
Shimron Hetmyer: क्रिकेटमध्ये शतक ठोकताना तुम्ही अनेक फलंदाजांना पाहिलं असेल. पण कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये शिमरोन हेटमायरने अशी खेळी केली आहे, ज्यामुळे त्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
ट्रिनबागो नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हेटमायरने अवघ्या ४३ चेंडूत नाबाद १११ धावांची खेळी केली. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर गुयाना अमेझॉन वॉरियर्सने १६ षटकांत ५ विकेट गमावत १८५ धावा केल्या.