CPL controversial umpiring decision Johnson Charles
esakal
CPL controversial umpiring decision Johnson Charles: क्रिकेटच्या मैदानावर भांडणं, एकमेकांना करण्यात येणारी स्लेजिंग, वाद हे काही नवीन नाही. पण, कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी जे घडलं, ते वाचून सारेच हैराण झाले आहे. सेंट किंट्स अँड नेव्हीस पॅट्रिओट्स विरुद्ध बार्बाडॉस ट्रायडंट्स यांच्यातल्या सामन्यात हा अजब प्रकार घडला. तिसऱ्या अम्पायरने पॅट्रीओट्सच्या फलंदाजाला बाद दिल्यानंतर सहकाऱ्यांनी डगआऊटमध्ये निषेध नोंदवला आणि आंदोलनाच्या भूमिकेत गेले... त्यानंतर विकेटचा Video पुन्हा पाहिला गेला अन् पुढे जे घडले, त्याने वाद झाला.