Zimbabwe domestic team scores 822 runs in 50 overs
esakal
One Triple Century, One Double Ton, One Hundred! क्रिकेटमध्ये गोलंदाजांना किंमत राहिलेली नाही... हे आपण सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाहतच आहोत... पण, एकूण आता जगभरातील क्रिकेटमध्ये सर्वांना फलंदाज व्हायचंय, पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकायचाय.. त्यामुळे ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये २६० धावा पुरेशा वाटत असताना ट्वेंटी-२०त तेवढ्या धावा होताना दिसत आहेत. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये चारश-साडे चारशे धावा झाल्याचा इतिहास आहे. पण, त्याच ५०-५० षटकांच्या क्रिकेटमध्ये एकाच संघाने ८०० हून अधिक धावा करण्याचा प्रसंग कदाचित प्रथमच घडला असेल.