क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२५ चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला. या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. टेंबा बावुमा कर्णधार असून, रवींद्र जडेजा १२ वा खेळाडू आहे..कसोटी क्रिकेटचे २०२५ वर्षातील सर्व सामने संपले आहेत. या वर्षात कसोटीतही अनेक अविस्मरणीय सामने आणि कामगिरी पाहायला मिळाली. एकिकडे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने केवळ ११ दिवसात ऍशेसचे तीन सामने जिंकत मालिका जिंकली. भारत आणि इंग्लंड संघातही कमालीची रोमांचक कसोटी मालिका झाली. भारताला दक्षिण आफ्रिकेने मायदेशात व्हाईटवॉशचा धक्का दिला. .Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा.दरम्यान, वर्षभरात अनेक खेळांडूंनीही शानदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डर ब्रायन लारा यांच्या ४०० धावांच्या विक्रमाच्या जवळ पोहचला होता, तर शुभमन गिलने इंग्लंडमध्ये ४ शतके ठोकली. मिचेल स्टार्कने पहिल्या दोनच ऍशेस सामन्यांत मिळून तब्बल १८ विकेट्स घेतल्या.जो रुटने ऑस्ट्रेलियात पहिले शतक साजरे केले, तर वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात एडेन मार्करमने कमालीची शतकी खेळी केली.दरम्यान, वर्षभरातील सर्व कामगिरी लक्षात घेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२५ चा सर्वोत्तम कसोटी संघ (Cricket Australia's Test Team of 2025) बनवला आहे. या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन भारतीय, तर चार ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार मात्र दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बावुमाला करण्यात आले आहे. तसेच बारावा राखीव खेळाडूही निवडण्यात आला असून तो देखील भारतीय खेळाडू आहे. म्हणजे १२ खेळाडूंमध्ये एकूण ४ भारतीय खेळाडू आहेत..क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सलामीसाठी भारताचा केएल राहुल आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला निवडले आहे. केएल राहुलने २०२५ मध्ये १९ कसोटी डावात ३ शतकांसह ८१३ धावा केल्या आहेत. हेडने २१ डावात २ शतकांसह ८१७ धावा केल्या आहेत. हे दोघेही या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी जो रुटला निवडण्यात आले आहे. त्याने १८ डावात ४ शतकांसह ८०५ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आहे. तो या वर्षात सर्वाधिक कसोटी झाला करणारा खेळाडू आहे. त्याने १६ डावात ५ शतकांसह ९८३ धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकासाठी टेंबा बावुमाची निवड झाली असून तो या संघाचा कर्णधारही असेल. त्याने कर्णधार म्हणून शानदार नेतृत्व केले आहे. तो अद्याप एकही कसोटी मालिका हरलेला नाही. त्याने ७ डावात खेळताना ३१० धावा केल्या आहेत, ज्यात १ शतकाचा समावेश आहे. .यष्टीरक्षकाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स कॅरीकडे देण्यात आली असून तो सहाव्या क्रमांकासाठी निवडले आहे. त्याने ११ सामन्यांत २ शतकांसह ७६७ धावा केल्या आहेत. त्याने ४४ झेल आणि ५ यष्टीचीतही केले आहेत. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स असून त्यानेही कमालीचा खेळ या वर्षात केला आहे. त्याने ९ सामन्यांतील १६ डावात १ शतकासह ४९६ धावा केल्या आणि ३३ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर ८, ९, १० आणि ११ व्या क्रमांकावर गोलंदाज आहेत. ८ व्या क्रमांकावर मिचेल स्टार्कची निवड करण्यात आली आहे. तो २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ११ सामन्यांत ५५ विकेट्स घेतल्या आहेत. इतकेच नाही, तर ३ अर्धशतकांसह २८४ धावाही केल्या आहेत. त्यापाठोपाठ ९ व्या क्रमांकावर भारताचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने ८ सामने खेळताना ३१ विकेट्स घेतल्या आहेत. .Most ODI Runs in 2025: ज्यांच्या निवृत्तीसाठी देव पाण्यात ठेवले, त्या विराट कोहली, रोहित शर्माने वर्ष गाजवले; भन्नाट आकडेवारी .१० व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्कॉट बोलंड असून त्याने ६ सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या आहेत. ११ व्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सिमॉन हार्मर असून त्याने ४ सामन्यांतच ३० विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय १२ वा खेळाडू म्हणून भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची निवड झाली आहे. त्याने २०२५ वर्षात १० सामन्यांत ७६४ धावा केल्या आहेत, तर २५ विकेट्स घेतल्या आहेत..क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कसोटी संघ २०२५ -केएल राहुल (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), जो रुट (इंग्लंड), शुभमन गिल (भारत), टेंबा बावुमा (कर्णधार)(दक्षिण आफ्रिका), ऍलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया), बेन स्टोक्स (इंग्लंड), जसप्रीत बुमराह (भारत), स्कॉट बोलंड (ऑस्ट्रेलिया), सिमॉन हार्मर (दक्षिण आफ्रिका).१२ वा खेळाडू - रवींद्र जडेजा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.