
Indian Fans Praying for Champions Trophy Final: क्रिकेट म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी एखाद्या धर्माप्रमाणेच आहे. भारतीयांचे क्रिकेटवरील प्रेम आपल्याला वेळोवेळी दिसून येतेच. अशात आज भारत व न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यसाठी भारतीय चाहते प्रचंड उत्सुक आहेत. फायनलमध्ये भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी देशभरातील विविध मंदिरात हवन, पूजा व आरत्यांचे आयोजन केले आहे.
कानपूरमधझील चाहत्यांकडून राधा माधव मंदिरात भारताच्या विजयासाठी हवन करण्यात आला आला. यावेळी त्यांनी भारतीय खेळाडूंच्या फोटो व तिरंगा देखील घेतला होता. हवानाच्या इथे बॅट, हेल्मेट ठेवण्यात आले.