
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी सकाळीच आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशाला मान्यता दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या IOC च्या १४१व्या अधिवेशनात हा निर्णय घेतला गेला आहे. १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. १९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटन डेव्हॉन व सोमरसेट वंडरर्स संघाने फ्रान्सच्या फ्रेंच एथलेटिक क्लब युनियनवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता २०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट दिसणार आहे, परंतु यात पाकिस्तानला खेळता येईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहेच.