IND vs ENG: Jadeja Abuses Thakur Over Fielding; Heated Exchange on Field : भारतीय क्रिकेट संघाला लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्सनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात इंग्लंडविरुद्ध चौथ्या डावात टीम इंडिया ३७१ धावांचे रक्षण करण्यात अपयशी ठरली. या सामन्यात खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी हे संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण बनले. पण, आता वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे. सामना सुरू असताना शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा मैदानावर भिडले.