
Yuzvendra Chahal Post on Instagram: भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहे. सध्या त्याचा आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. यातच आता त्याने केलेली गुढ पोस्ट अनेकांचे लक्ष वेधत आहे. त्याच्या या पोस्टने त्याच्या आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.