
Cricketers selected for Bangladesh Test series to be replaced in Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतातील ही एक मानाची देशांतर्गत स्पर्धा आहे. यंदा या स्पर्धेत अनेक मोठे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत ए, बी, सी आणि डी असे चार संघ खेळताना दिसणार आहेत. या चार संघात एकूण ६ सामने होणार असून २२ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा संपणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर ज्या संघाचे सर्वाधिक गुण असतील, तो संघ विजेता ठरेल. दरम्यान, या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार असून त्यांची संघात निवडही झाली आहे.
भारतीय संघाला आगमी ४ महिन्यांत १० कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यासाठी देशांतर्गत क्रिकेटचा मोसम सुरू करणारी ही दुलीप करंडक स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.