

R ASHWIN ON MS DHONI
esakal
R ASHWIN ON MS DHONI: चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघात आयपीएल २०२७ आधी मोठे बदल होत आहेत. संघाने झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता एमएस धोनीच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने धोनी पुढच्या हंगामात संघाचा मेंटॉर म्हणून काम करू शकतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार की संघाला बाहेरून मार्गदर्शन करणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.