Dasun Shanaka four wickets in four balls
esakal
Seattle Orcas vs Texas Super Kings highlights: दासून शनकाने मेजर क्रिकेट लीग ( MLC) स्पर्धेतील सोमवारचा सामना गाजवला.. सिएटल ऑर्कास संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दासूनने चार चेंडूत चार विकेट्स घेताना टेक्सास सुपर किंग्सला कमी लक्ष्याचा पाठलाग करतानाही हार मानण्यास भाग पाडले. १२२ धावांचा पाठलाग करताना सुपर किंग्सने ५ बाद १०५ धावा केल्या होत्या आणि डोनोव्हन फरेरा व शुभम रांजणे मैदानावर उभे होते. १९व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर फरेराने चौकार व षटकार खेचला आणि त्यानंतर २०व्या षटकाचा पहिला चेंडू रांजणने चौकार खेचला.