
David Warner Bat Broken Video Viral : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तुफान फटकेबाजी केली. होबार्ट हरिकेन्स विरूद्धच्या सामन्यात वॉर्नरने ६६ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधाराने एकहाती संघाचा भार सांभाळत २० षटकांत संघासाठी १६४ धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात एक विनोदी किस्सा घडला.
लेग साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात असाताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरची बॅट तुटली आणि त्याच्या हेल्मेटवर आदळली. वॉर्नरच्या बॅट ब्रेकिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.