DEEPTI SHARMA: शतक ठोकलं अन् इतिहास रचला! दीप्ती शर्माची अशी कामगिरी, थेट सचिन तेंडुलकरांच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री

DEEPTI SHARMA JOINS SACHIN TENDULKAR ELITE CLUB: दीप्ती शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १०६ धावा आणि तीन विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली. यासह वनडेत १५० पेक्षा जास्त विकेट्स आणि दोन शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास क्लबमध्ये तिने प्रवेश केला.
DEEPTI SHARMA JOINS SACHIN TENDULKAR ELITE CLUB

DEEPTI SHARMA JOINS SACHIN TENDULKAR ELITE CLUB

esakal

Updated on: 

DEEPTI SHARMA JOINS SACHIN TENDULKAR ELITE CLUB: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर दीप्तीने गोलंदाजीतही तीन विकेट्स घेतल्या. या शानदार कामगिरीसह तिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारताने या सामन्यात झिम्बाब्वेचा १२१ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ६ विकेट्स गमावून ३२८ धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करताना, झिम्बाब्वेचा डाव ४८.५ षटकांत २०७ धावांवर आटोपला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com