

Syed Mushtaq Ali Trophy
esakal
Delhi Posts Massive 275 Runs Against Tamil Nadu: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळताना मंगळवारी प्रियांश आर्यने जबरदस्त खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंगळवारी खेळवल्या जात असलेल्या सामन्यात त्याने तमिळनाडूच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला.
त्याने ३६ चेंडूंत धडाकेबाज शतक झळकावलं. यामध्ये त्याने तब्बल १२ षटकार मारले. झालं असं की, तमिळनाडूच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती.