

Delhi Capitals
esakal
Delhi Capitals IPL 2027 trials: आयपीएल २०२७ ची तयारी दिल्ली कॅपिटल्सने आतापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी बंगळुरू येथील जस्ट क्रिकेट अकादमीमध्ये खेळाडूंच्या ट्रायल्स सुरू आहेत. या ट्रायल्समध्ये मुंबईच्या चार युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. आयुष वर्तक, अयाझ खान, दिव्यांश सक्सेना आणि वेदांत गोरे हे चारही खेळाडू आपल्या खेळाने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या ट्रायल्सवर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी अष्टपैलू युवराज सिंग आणि माजी फिरकीपटू अमित मिश्रा यांची नजर आहे. त्यामुळे या चारही खेळाडूंसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.