

Devdutt Padikkal Century
esakal
Devdutt Padikkal Hits a Brilliant Century: श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा सराव सामना सुरू आहे. तीन दिवसांच्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत आपली दावेदारी मजबूत केली आहे. पडिक्कलने १०३ धावांची खेळी केली आणि त्यानंतर तो रिटायर्ड आऊट झाला.
पहिल्या दिवशी श्रीलंका क्रिकेट ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरुवातीला भारतीय गोलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं. निशान मदुष्का आणि रविंदू रसांथा यांनी ११० धावांची सलामी भागीदारी केली,आणि त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी जोरदार पुनरागमन केलं.