धनश्री वर्माने अखेर चहलसोबतच्या घटस्फोटाबद्दल मौन सोडले आणि ‘Sugar Daddy’ टी-शर्टवर टीका केली.
चहलने सांगितले की तो टी-शर्ट एक “संदेश” देण्यासाठी घातला होता.
धनश्रीने प्रतिक्रीया देताना म्हटले – “भाई, WhatsApp कर देता, टी-शर्ट क्यू पहना है?”
Dhanashree Verma slams Yuzvendra Chahal Sugar Daddy tshirt : अभिनेत्री, कोरियोग्राफर धनश्री वर्मा हिने अखेर भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याच्यासोबत झालेल्या घटस्फोटावर मौन सोडले आहे. मार्च महिन्यात या दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यावेळी न्यायालयात चहल ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर लिहिलेला टी शर्ट घालून आला होता. त्यावरून धनश्रीने जोरदार टीका केली आहे.