वेंगसरकर यांचा बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंट धोरणाला विरोध
खेळाडू तंदुरुस्त असेल तर त्याने सर्व सामने खेळले पाहिजेत, वेंगसरकर यांचे मत
मी हे माझ्या कार्यकाळात असे खपवून घेतले नसते, वेंगसरकर
भारताचे माजी क्रिकेटपटू व निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी टीम इंडियाच्या वर्कलोड व्यवस्थापनावर सडकून टीका केली आहे. विशेषतः जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) खेळवण्यावरून जो गोंधळ सुरू आहे, त्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडू दुखापतग्रस्त असेल, तरच त्याला विश्रांती द्यायला हवी. विशेषतः बुमराहसारख्या खेळाडूने स्वेच्छेने सामना वगळता कामा ये, असेही ते म्हणाले.