थोडक्यात: भारत - इंग्लंड तिसऱ्या कसोटीदरम्यान जितेश शर्माला लॉर्ड्सवर प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.या प्रकरणावर दिनेश कार्तिकने स्पष्टीकरण दिले..इंग्लंड आणि भारत संघात कसोटी मालिकेतीत तिसरा सामना १० ते १४ जुलैदरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानात झाला. या सामन्यात भारताला २२ धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर येण्यापासून रोखण्यात आल्याच्या बऱ्याच चर्चा एका व्हायरल व्हिडिओमुळे झाल्या. त्यावर आता भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने स्पष्टीकरण दिले आहे. .Dinesh Karthik: विराट कोहलीशी कसोटी कर्णधारपदाबाबत काय झालेली चर्चा? शुभमन गिलचा उल्लेख करत कार्तिकने केला खुलासा.सोशल मीडियावर काही दिवसांपू्र्वी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दिसते की जितेश शर्माला चाहत्यांनी घेरले आहे. तो मी जितेश शर्मा असल्याचेही तो सांगत आहे. काहीवेळात तो दिनेश कार्तिकच्या दिशेने ओरडून बोलत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर दिनेश त्याला घेऊन गेल्याचे समजत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडमध्ये येताना जितेश शर्माला सिक्युरिटी गार्डने आडवले होते. नंतर दिनेश कार्तिक त्याला घेऊन आत गेला. या व्हायरल व्हिडिओनंतर जितेश शर्माला आडवण्यावरून बरीच चर्चा झाली. .आता अखेर दिनेश कार्तिकने यामागील स्पष्टीकरणाची एक पोस्ट शेअर केली असून त्यानेच जितेशला बोलावले असल्याचे खुलासा केला आहे. दिनेश कार्तिकने लिहिले, 'हे अशा समस्या आहेत, ज्याचा सामना सोशल मीडिया करत आहे. मी जितेशला कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवले होते, तो आला, त्यानंतर मी आलो आणि खाली त्याला भेटलो व त्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन गेलो. तो तिथे सर्वांना भेटला. तथापि, ही घटना मिडिया सेंटरच्या खालील आहे, मैदानाच्या गेटवरील नाही.'.दरम्यान, जितेशने अद्याप भारताकडून कसोटी पदार्पण केले नाही. पण त्याने ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने भारतासाठी खेळले आहेत. तो सध्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघाचा भाग नाही. तो तिसऱ्या सामन्यावेळी प्रेक्षक म्हणून स्टेडियममध्ये आला होता. जितेश आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. या संघाचा दिनेश कार्तिक मेंटॉर आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे..Jitesh Sharma Video : ईडा पिडा टळो....! RCB च्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जितेश शर्माने बघा कुणाची दृष्ट काढली... .जितेशने आयपीएल २०२५ मध्ये बंगळुरूसाठी चांगली कामगिरीही केली होती. त्याने ११ डावात २६१ धावा केल्या होत्या. तसेच नियमित कर्णधार रजत पाटिदारच्या जागेवर त्याने या संघाचे दोन सामन्यांत नेतृत्वही केले होते. जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत विदर्भाकडून खेळला आहे. त्याने गेल्या हंगामात सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही विदर्भाचे नेतृत्व केले होते. पण आता तो आगामी २०२५-२६ हंगामात बडोदाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे..FAQs.जितेश शर्माचा कोणता दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला?लॉर्ड्स स्टेडियमच्या गेटवर जितेशला सुरक्षारक्षकाने थांबवले, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला..दिनेश कार्तिकने या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?दिनेश कार्तिकने सांगितले की, हे गैरसमजाचे प्रकरण असून चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे..जितेश शर्मा कोण आहे?जितेश शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.