
Dinesh Karthik Half Century: भारतीय माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक सध्या दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग खेळत आहे. या लीगमध्ये तो पार्ल रॉयल्स संघाचा भाग आहे. स्पर्धेतील कालचा सामना कार्तिकने गाजवला. जोबर्ग सुपर किंग्ज (जेएसके) सामन्यात सलग तीन षटकार ठोकत कार्तिकने अर्धशतकी खेळी केली. त्याने सामन्यात ३९ चेंडूत ५३ धावा करत संघासाठी सर्वात मोठी खेळी केली. पण पार्ल रॉयल्स संघाला हा सामना गमवावा लागला. जेएसके संघाचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने दमदार खेळी करत संघाला विजयी केले.