
Dinesh Karthik Playing SA20 : आयपीएलमधून निवृत्त झालेला विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिका प्रिमिअर लीग खेळत आहे. SA20 मध्ये तो पार्ल रॉयल्स (Paarl Royals) संघाचा भाग आहे. कार्तिकने आपला पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न केप संघाविरूद्ध खेळला. या सामन्यात पार्ल रॉयल्स संघाने बाजी मारली. स्पर्धेबद्दल बोलताना कार्तिकने 'आपीएलनंतरची सर्वोत्तम स्पर्धा' असा उल्लेख केला.
बीसीसीआयच्या सध्याच्या धोरणानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलसह परदेशी लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे कार्तिक दक्षिण आफ्रिका लीगमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे.