भारत-पाकिस्तान यांच्यात WCL मध्ये होणारा सामना रद्द करण्यात आला
भारतीय खेळाडूंनी या सामन्यापूर्वी माघार घेतली
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना यामुळे राग आला आहे
Salman Butt asks India to skip Pakistan in World Cup and Olympics
भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध आणखी ताणले गेले आहेत. त्यात पाकिस्तानसोबत कोणत्याच स्पर्धेत क्रिकेट सामना नको, अशी मागणी जोर धरताना दिसतेय. त्यामुळेच लेजेंड्स वर्ल्ड सीरिज ( WCL) मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारताच्या माजी खेळाडूंनी माघार घेतली आणि त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. पण, भारतीय खेळाडूंच्या भूमिकेवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना प्रचंड राग आला आहे आणि ते आता काहीही बरळताना दिसत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी, अब्दुर रौफ यांच्यानतंर आता माजी कर्णधार सलमान बट यानेही टीका केली आहे.