IND A vs NZ A Live: न्यूझीलंडच्या फलंदाजांचा रडीचा डाव, अचानक मैदान सोडले! भारताला विजयासाठी एकच विकेट हवी होती, १७ षटकं शिल्लक होती... नेमकं काय घडलं?

drama in India A vs New Zealand A! Auqib Nabi Stars: भारत अ संघाला विजयासाठी केवळ एक विकेट हवी होती आणि १७ षटके शिल्लक होती. त्याचवेळी कर्टीस हिफी आणि जेडन लेनॉक्स यांनी मैदान सोडले. नेमकं काय घडलं?
Auqib Nabi

Auqib Nabi

ESAKAL

Updated on: 

India A vs New Zealand A unofficial Test bad light drama : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातल्या सामन्यात नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. पहिला डाव ११३ धावांवर गडगडल्यानंतरही भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. न्यूझीलंडला त्यांनी गुडघे टेकायला भाग पाडले होते. पण, सलामीवीर कर्टीस हिफी नाबाद ९० धावांसह मैदानावर उभा राहिला... चौथ्या दिवसाची १७ षटकं शिल्लक असताना भारताला विजयासाठी केवळ एक विकेट घ्यायची होती. पण,हिफी व जेडन लेनॉक्स यांनी अचानक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.. भारतीय खेळाडू गोंधळले अन् अम्पायरला जाब विचारू लागले. भारताचा विजय निश्चित असताना किवी फलंदाजांच्या या कृतीने सारेच चक्रावले...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com