N Jagadeesan Smashes 197 in Duleep Trophy Semifinal
esakal
भारतीय संघात रोहित, विराट आणि अश्विन यांच्या निवृत्तीनंतर नव्या खेळाडूंमध्ये कसोटी व T20 संघासाठी कडवी स्पर्धा आहे.
आशिया चषकासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्येही अंतिम ११ साठी टक्कर दिसते आहे.
दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत एन जगदीशनने उत्तर विभागाविरुद्ध १९७ धावांची शानदार खेळी केली.
N Jagadeesan’s Record Knock Puts Pressure on Rishabh Pant’s Place : भारतीय संघात कर्णधारपदापासून ते प्रत्येक जागेसाठी कडवी चुरस पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यांच्या निवृत्तीनंतर कसोटी व ट्वेंटी-२० संघात जागा पटकावण्यासाठी युवा खेळाडूंमध्ये शर्यत लागली आहे. त्यामुळे आता संघात असलेल्यांची जागा पक्की मानली जात नाही.
भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत पोहोचला आहे आणि त्यासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्येही अंतिम ११ साठी टक्कर आहे. अशात पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात दावा ठोकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.