Ishan Kishan completes 4000 runs in First-Class cricket
esakal
Ishan Kishan Scripts First-Class Milestone With A Fifty : इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पूर्व विभाग संघाने दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये पहिल्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवले. इशानच्या फटकेबाजीने दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा याच्यावरील दडपण वाढवले आहे. वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळ करून असाच दबाव निर्माण केला होता, पंरतु तिलकने स्लेजिंग करून वैभवला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले आणि विकेट मिळवली. पण, त्यानंतरही अभिमन्यू इश्वरन, इशान व शिखऱ मोहन यांनी पूर्व विभागाला मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करून दिली आहे.