Ayush Mhatre century IND U19 vs ENG U19 first Youth Test : भारताचा सीनियर संघ इंग्लंडमध्ये दबदबा दाखवत असताना १९ वर्षांखालील पोरंही कमाल करत आहेत. इंग्लंड - भारत यांच्यातल्या १९ वर्षांखालील वन डे मालिकेत पाहुण्या भारताने ३-२ अशी बाजी मारली आणि आता एकमेव चार दिवसीच सामना आजपासून सुरू झाला आहे. वन डे मालिकेत धावांचा पाऊस पाडणारा वैभव सुर्यवंशी कसोटी सामन्यासाठी अजून सज्ज नाही हे या सामन्यात दिसले. पण, वन डे मालिकेत अपयशी ठरलेल्या कर्णधार आयुष म्हात्रेने या सामन्यात शतक झळकावून आपला क्लास दाखवला.