
ENG vs AFG Champions Trophy 2025: इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उद्या (ता. २६) चॅम्पियन्स करंडकातील ब गटातील महत्त्वपूर्ण लढत रंगणार आहे. दोन्ही देशांना पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंड व अफगाणिस्तान या देशांना विजय आवश्यक आहे.