IND VS ENG 1ST ODI: भारताने फास आवळला, पण जो रूट नडला; सोबतीला डॉसन जबरदस्त खेळला, इंग्लंडनं उभं केलं तगडं लक्ष्य

England vs India 1st ODI Mararhi Cricket News: भारताच्या गोलंदाजांनी अवघ्या ८० धावांत पाच फलंदाज माघारी धाडले. मात्र, अनुभवी जो रूटने एका बाजूने खंबीरपणे उभे राहत भारताचा विजयाचा मार्ग सहज होऊ दिला नाही.
India vs England first ODI match highlights

India vs England first ODI match highlights

esakal

Updated on

India vs England 1st ODI Mararhi Live Scoreboard update: वन डे क्रिकेट का उत्सुकता वाढवतं हे भारत-इंग्लंड सामन्यातून पाहायला मिळाले... इंग्लंडच्या सलामीवीरांनी बिनबाद ६१ अशी धावसंख्या उभी केल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा पलटवार झाला. इंग्लंडचे ५ फलंदाज पुढील १९ धावांत तंबूत परतले आणि त्यांची अवस्था ५ बाद ८० अशी दयनीय झाली. गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा व जसप्रीत बुमराह यांनी धक्के दिले. पण, जो रूट ( Joe Root) मैदानावर उभा राहिला आणि त्याला लिएम डॉसनने ( Liam Dawson ) साथ दिली. या दोघांच्या १३४ चेंडूंत १२१ धावांच्या भागीदारीने इंग्लंडने पुन्हा पुनरागमन केले आणि भारतासमोर सन्मानजनक धावसंख्या उभी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com