भारताच अ संघ या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ३० मे ते २ जून या कालावधीत कँटबेरीला पहिला चार दिवसीय सराव सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला आणि यापैकी काही खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वरिष्ठ संघात संधी मिळू शकते. संधी मिळण्याची शक्यता असलेल्या अशाच एका खेळाडूने स्वतःच्या फिटनेसवर जोर देताना १० किलो वजन कमी केलं आणि आता तो इंग्लंडचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.