India Tour of England: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा या सीनियर खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया युवा खेळाडूंची फौज घेऊन शुभमन गिलच्या ( Shubman Gill) नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहितनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह हे नाव चर्चेत होतं. पण, त्याची तंदुरुस्ती आडवी आली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याला त्याचं ऐकणारा कर्णधार हवा होता. त्यामुळेच शुभमनच्या नावावर शिक्कामोर्तब झाली. पण, ऐकणारा म्हणून ज्याची निवड केली, त्यानेच संघ निवड करताना बंडाचे निशाण फडकवले. कसोटी संघ निवडताना एका खेळाडूवरून गिल-गंभीर समोरासमोर आले असल्याचे वृत्त समोर येत आहे.