India’s strongest XI for Test series against England : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या हंगामातील ही टीम इंडियाची पहिलीच मालिका आहे. पण, या मालिकेपूर्वी रोहित शर्मा व विराट कोहली या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंवर आता भीस्त आहे आणि इंग्लंडवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण त्यांच्यावर असणार आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, लॉर्ड्स, मॅनचेस्टर आणि ओव्हल येथे होणार आहेत.