
भारत आणि इंग्लंड संघातील लॉर्ड्सवर होत असलेला तिसरा कसोटी सामनाही रोमांचक होत आहे. पहिल्या दोन्ही दिवशी दोन्ही संघांकडून चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. एकीकडे इंग्लंडचा दिग्गज जो रुटने भारताविरुद्ध ११ वे शतक झळकावलं, तर दुसरीकडे भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने ५ विकेट्सही विक्रमी कामगिरी केली.
या सामन्यावेळी बुमराहने कपिल देव यांच्याही मोठ्या विक्रमाला मागे टाकले. त्याच्या या पराक्रमानंतर मोहम्मद सिराजने त्याच्यासोबत जे केलं, त्याने मात्र सर्वांची मनं जिंकली आहेत.