IND vs ENG: टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणार इंग्लंडचा २१ वर्षीय गोलंदाज; आजच मोडला ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम

India Tour of England : पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने आज टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ नव्या पोरांना घेऊन या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळेच त्यांच्यासमोरा आव्हानही तगडे असणार आहे.
SHOAIB BASHIR
SHOAIB BASHIR esakal
Updated on

भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी २५ वर्षीय शुभमन गिलच्या ( Shubman Gill Capitain) खांद्यावर सोपवली गेली आहे. जो रूट, झॅक क्रॉली, ऑली पोप, बेन डकेट, बेन स्टोक्स अन् हॅरी ब्रूक अशा दिग्गजांचा सामना टीम इंडियाला करायचा आहे. पण, भारताची डोकेदुखी यापैकी नव्हे, तर दुसराच खेळाडू वाढवणार आहे. २१ वर्ष २२१ दिवसांच्या असलेल्या या खेळाडूने आज इंग्लंडच्या कसोटीतील ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून टीम इंडियाला आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com