ZAK CRAWLEY BEN DUCKETT OLLIE POPE esakal
Cricket
IND vs ENG : टीम इंडियाचं काही खरं नाही, इंग्लंडच्या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी ठोकले शतक; BCCI ने संघ निवडण्यापूर्वी विचार करावा
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त इशारा दिला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामन्यात झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप या तिघांनीही शतके झळकावून भारताच्या गोलंदाजीसाठी गंभीर धोका निर्माण केला आहे.
England vs Zimbabwe Test Match: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या कसोटीतून निवृत्तीमुळे निवड समितीसमोर नवीन कर्णधार निवडण्याचा पेच आहे. शुभमन गिल याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व जाण्याची दाट शक्यता आहे आणि येत्या शनिवारी या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्याचे वृत्त आहे. रोहित-विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया नव्या दमाच्या खेळाडूंसह या दौऱ्यावर जाईल हे पक्के आहे आणि त्यांच्यासमोरील आव्हान तितके सोपे नक्कीच नसेल.