England Cricket: इंग्लंडला तगडा धक्का! अनुभवी वेगवान गोलंदाज यंदाच्या संपूर्ण वर्षासाठी क्रिकेटला मुकणार, जाणून घ्या कारण

Mark Wood ruled out for rest of year : इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाजाला उर्वरित संपूर्ण वर्षातील क्रिकेटला मुकावे लागणार आहे, याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
Mark Wood | England Cricket team
Mark Wood | England Cricket teamSakal
Updated on: 

Mark Wood : इंग्लंड संघ सध्या श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका सुरू असतानाच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूडला यंदाच्या उर्वरित वर्षात क्रिकेट खेळता येणार नाही.

मार्क वूड सध्या कोपराच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. खरंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळता आले नव्हते.

त्यानंतर त्याने त्याच्या जॉइंट्समध्ये काहीशा वेदना होत असल्याने रुटीन स्कॅन केले. त्यामध्ये त्याच्या कोपराची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे.

Mark Wood | England Cricket team
England Cricket Coach: राहुल द्रविडच नाव होतं चर्चेत; पण संघाने दुसऱ्याकडे सोपवली प्रशिक्षकांची जबाबदारी
Loading content, please wait...