

England vs Nepal
sakal
मुंबई : दोन वेळचा विश्वविजेता इंग्लंडचा संघ आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नेपाळशी लढणार आहे. टी-२० विश्वकरंडकातील क गटातील सामना दुपारी खेळवण्यात येणार आहे. सलामी फलंदाज फिल सॉल्ट याने शुक्रवारी (ता. ६) सराव केला असल्यामुळे तो इंग्लंडसाठी सलामीचा सामना खेळण्यास तंदुरुस्त झाला आहे. नेपाळविरुद्धच्या लढतीत इंग्लंडचेच पारडे जड असणार आहे.