
England vs Australia Test Match: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना १८७७ मध्ये रंगला. आता २०२७ मध्ये उभय देशांच्या कसोटी क्रिकेटला दीडशे वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यामध्ये मेलबर्न येथे ही लढत होणार असून ११ ते १५ मार्चदरम्यान दोन देशांमध्ये खडाजंगी पाहायला मिळेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.