
भारत आणि इंग्लंड संघात मँचेस्टरला झालेला कसोटी सामना शेवटपर्यंत रोमांचक झाला. या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या दोन दिवसात अविश्वसनीय झुंज देत अखेर हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. एका क्षणी पराभवाची तलवार डोक्यावर असताना भारताच्या केएल राहुल, कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्ट सुंदर हे लढले आणि हा सामना वाचवला आहे.
त्यामुळे आता पाच सामन्यांच्या मालिकेत आता इंग्लंड संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंड संघावरील मालिका पराभवाचे संकट मात्र टळले आहे. कारण शेवटच्या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला, तर मालिका बरोबरीत सुटेल, तर अनिर्णित राहिला किंवा इंग्लंडने सामना जिंकला, तर ते ही मालिकाही जिंकतील.