
भारत आणि इंग्लंड संघात सध्या वेगवेगळ्या प्रकारात सामने पाहायला मिळत आहेत. भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताच्या महिला संघाने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली होती.
मात्र शुक्रवारी (४ जुलै) तिसर्या टी२० सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला. भारताला तिसरा सामना जिंकून मालिकाही खिशात घालण्याची संधी होती. परंतु, इंग्लंडने शेवटच्या क्षणी भारतावर मात करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. सध्या या मालिकेत तीन सामन्यांनंतर भारत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण स्मृती मानधना आणि शफली वर्मा यांच्या आक्रमक खेळानंतरही भारताला २० षटकात ५ बाद १६६ धावाच करता आल्या. मानधनाने अर्धशतकी झुंज दिली.