

Delhi Capitals' ₹6.25 Cr signing now risks a two-year ban : इंग्लंडचा मधल्या फळीतला फलंदाज हॅरी ब्रूक याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मधून माघार घेतली आहे. आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने नोव्हेंबरमधील मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी तो IPL मधून माघार घेत आहे आणि नव्या नियमांनुसार त्याच्यावर दोन हंगामांसाठी बंदीची कारवाई होऊ शकते.