श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर यांना वगळल्यामुळे आशिया कप टीमवर टीका.
कृष्णमचारी श्रीकांत यांनी या संघाला वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता नाही असे म्हटले.
रिंकू सिंग, शिवम दुबे आणि हर्षित राणा यांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला.
Former selectors Kris Srikkanth criticizing India’s Asia Cup 2025 team : आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली... सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघ ठरला, परंतु त्यावरून टीकाही सुरू झाली आहे. श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जैस्वाल अशी काही नावं या टीममधून गायब दिसल्याने ही टीका होत आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा अंतिम संघ नाही, हे कालच स्पष्ट केले. पण, भारताचा माजी निवड समिती प्रमुख आणि फलंदाज कृष्णमचारी श्रीकांत ( Kris Srikkanth ) यांनी टीका केली आहे.