KKR चा माजी खेळाडू संकटात! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप

Match-Fixing Charges Rock Former KKR Player Sachithra Senanayake : २०१४ साली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंका संघाचा भाग असलेला आणि IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळलेला फिरकीपटू सचित्रा सेनानायके अडचणीत सापडला आहे.
Sachithra Senanayake
Sachithra Senanayake esakal
Updated on

Sri Lanka T20 World Cup winner charged with fixing

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू सचित्रा सेनानायके ( Sachithra Senanayake ) याच्यावर लंका प्रीमियर लीग (LPL) च्या २०२० आवृत्तीदरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हंबनटोटा उच्च न्यायालयाने माजी फिरकीपटूवर एका सहकारी खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोप लावला आहे. वृत्तानुसार, तो स्वतः स्पर्धेत खेळाडू नव्हता आणि स्पर्धा सुरू असताना तो परदेशात होता, परंतु त्याने मॅच फिक्सिंगसाठी खेळाडूंशी संपर्क साधला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com