ICC World Cup 2027 new format explained
esakal
The ICC has approved a new format for 2027 World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप आणि २०२८ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फॉरमॅट बदलाला मान्यता दिलेली आहे. एडिनबर्ग येथे झालेल्या या बैठकीत तीन संलग्न संघटनेच्या प्रतिनिधिंच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. या नव्या फॉरमॅटमुळे स्पर्धेतील चुरस आणखी वाढणार आहे. २०२७ चा वन डे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. या स्पर्धेत १४ संघांचा समावेश असेल, परंतु अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे.