India vs Afghanistan T20I series 2026 schedule
esakal
Why India will play as away team in Delhi: भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. पण, घरच्या मैदानावर खेळणारा भारतीय संघ मालिकेत पाहुणा म्हणून उतरेल. कारण, या मालिकेचे आयोजन अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) करणार आहे. वेळापत्रकात काही बदल न झाल्यास, ही मालिका क्रिकेटच्या इतिहासात एक अनोखा विक्रम प्रस्थापित करेल.