Why Pratika Rawal Didn’t Receive a World Cup Winners’ Medal?
esakal
Why Pratika Rawal didn’t get World Cup medal ICC rule explained? कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि आता हरमनप्रीत कौर... भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधारांमध्ये हरमनने तिचं नाव कोरलं आहे. रविवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून भारताने महिला वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी २००५ व २०१७ मध्ये भारतीय संघाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण, काल हरमनप्रीतच्या संघाने ती रेषा ओलांडली आणि वर्ल्ड कप जिंकला. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते जेतेपदाची ट्रॉफी हरमनप्रीतला दिली गेली. त्याआधी प्रतिका रावल सोडल्यास सर्व भारतीय खेळाडूंना आयसीसीने मेडल दिले गेले. असे का?