Did Axar Patel announce retirement from cricket after IPL 2025? विराट कोहली, रोहित शर्मा यांनी मागील महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. आता इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याच्या निवृत्तीचे वृत्त समोर आले आहे.
अक्षरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणइ त्यात त्याने क्रिकेटला निरोप देण्याचा निर्णय जाहीर केल्याचे दिसतेय. अक्षर पटेल असे म्हणत आहे की त्याचा क्रिकेटशी प्रवास फक्त इथपर्यंतच होता.