FACT CHECK : रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादला इंस्टाग्रामवर केले अनफॉलो , पाकड्याला ताफ्यात घेतल्याचा आलाय राग?

Rohit Sharma unfollow SRH Instagram fact check: सोशल मीडियावर सध्या एक दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) या संघाला अनफॉलो केले आहे. कारण काय तर SRH च्या मालकीच्या फ्रँचायझीने ‘द हंड्रेड’ स्पर्धेत पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला ताफ्यात घेतल्यामुळे रोहित नाराज झाला, असा दावा केला जात आहे.
Rohit Sharma unfollow SRH Instagram fact check

Rohit Sharma unfollow SRH Instagram fact check

esakal

Updated on

Abrar Ahmed The Hundred Sunrisers Hyderabad controversy: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याला दी हंड्रेड लीगसाठी सनरायझर्स हैदराबादची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने करारबद्ध केल्यापासून वाद सुरू झाला आहे. काव्या मारन अन् तिच्या टीमने २.३४ कोटी रुपये मोजून पाकिस्तानी खेळाडूला करारबद्ध केल्यानंतर आयपीएल फ्रँचायझीवर बहिष्कार टाकण्याची भाषा होऊ लागलीय. त्यात सनरायझर्स लीड्स संघाचे X अकाऊंट सस्पेंड करण्यात आले. त्यानंतर आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानेही SRH ला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com