Faf du Plessis creates history by becoming the oldest player to cross 12,000 runs in T20
esakal
Faf du Plessis Scripts History, Surpasses Shoaib Malik: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस यांना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. SA20 मध्ये जॉबर्ग सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने एमआय केप टाऊनच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने २१ चेंडूंत ४४ धावा कुटल्या आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ४०६ डावांत ८ शतकं व ८२ अर्धशतकांसह हा टप्पा पार केला आणि ट्वेंटी-२०त १२ हजार धावा करणारा तो जगातील दहावा फलंदाज ठरला. पण, ४१ वर्ष ओलांडल्यानंतर त्याने हा पराक्रम केला.