भारतीय वंशाच्या महेश तांबेने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला
फिनलँडचे प्रतिनिधित्व करताना इस्टोनियाविरुद्ध त्याने ९ चेंडूंत ५ विकेट्स घेतल्या
अफगाणिस्तानच्या राशिद खान याचा विक्रम तांबेने मोडला.
Mahesh Tambe fastest 5 wicket haul in T20I history : भारतीय वंशाचा महेश तांबे याने फिनलँड संघाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रमक केला. इस्टोनियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फिनलँडच्या ३९ वर्षीय महेश तांबेने ९ चेंडूंत पाच विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंत पाच विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.