Aaron Summers Child Abuse Charges : फेसबूकवरून ओळख, १५ वर्षीय शाळकरी मुलीला कारमध्ये बसवून नको नको ते कृत्य... ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवरील आरोप सिद्ध

Australian cricketer child abuse charges: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरोन समर्स याने २०१८ मधील एका अल्पवयीन मुलीशी संबंधित बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयात दोषी असल्याची कबुली दिली आहे.
Aaron Summers Pleads Guilty to Child Sexual Abuse Charges

Aaron Summers Pleads Guilty to Child Sexual Abuse Charges

esakal

Updated on

Aaron Summers Faces Jail After Admitting Child Abuse Charges: क्रिकेटवर्तुळाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आरॉन समर्सने त्याच्या बाल लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये दोषी असल्याची कबुली दिली. २०१८ मध्ये टास्मानियातील एका घटनेशी संबंधित आरोप कबुल केल्यामुळे त्याला तुरुंगवास होऊ शकतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, टास्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स संघाकडून पूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या या ३० वर्षीय खेळाडूने एका मुलीला अश्लील सामग्री दाखवण्याच्या उद्देशाने जाळ्यात ओढल्याचा एक आरोप आणि लैंगिक अत्याचार केल्याचे दोन आरोप कबूल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com